Headlines

शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे !

Screenshot

नाशिक ,दि.०५ (द नरिमन पॉईंट )बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती सतत वाढत असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक रोड पोलिसांकडे असलेला तपास आता नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविला आहे .
याबाबत माहिती अशी कि ,बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात १२ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सुरवातीला हा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे होता परंतु त्यांनी संशयितांशी संगनमत करून तपासातील पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गिरी याना निलंबित केलेले आहे .दरम्यान बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आठशे पेक्षा अधिक शिक्षकांवर विविध आरोपातून गुन्हा दाखल झालेला आहे.सदर गुन्ह्याची व्याप्ती विस्तृत आहे . या घोटाळ्यातील आरोपात शासनाचे वर्ग १ अथवा उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई झालेली असून गुन्ह्याची व्याप्ती सातत्याने वाढत आहे .याच गुन्ह्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देखील यापूर्वीच अटक करण्यात आली होती .त्यांचा जमीन जिल्हा सत्र न्यायालयात फेटाळण्यात आलेला असून सध्या ते कारागृहात आहेत ,त्याच बरोबर त्यांच्यावर नवी मुंबई येथे येथे नव्याने गुन्हा दाखल झालेला आहे . या गुन्ह्यात तत्कालीन उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे . याबाबत शिक्षण विभागातील अनेक अधिकारी तपास अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. शिक्षण विभागाच्या सततच्या चौकशीतून काही संस्थाचालक यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत .
वरील सर्व गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्यासाठी नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना तपासाची जबाबदारी सोपविली आहे .सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे !

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading