Headlines

तुकाराम मुंढेंच्या आदेशाने धुळ्यात कारवाई!सोनगीर नजीक पहाटे लाखोंचा गुटखा जप्त

धुळे,दि.०४ (विशेष प्रतिनिधी)मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाका परिसरात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडलेल्या संशयीत वाहनातून राज्यात प्रतिबंधित साडे अठरा लाख रुपयांचा विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू साठा जप्त करण्यात आला.दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध व्यापाराविरूध्द मोहीम उघडल्यानंतर अनेकाचे धाबे दणाणले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोलनाका परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत होती.या दरम्यान संशयास्पद मालवाहू वाहन (क्र. एचआर-५५ एई-६८२१) तपासणी करतांना सदर वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला व व्ही-१ टोबॅको तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
या वाहनातून १७ लाख ७६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला, ७४ हजार रुपये किमतीची व्ही-१ टोबॅको तंबाखू अवैध आढळून आला. त्यामुळे पाच लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन देखील ताब्यात घेऊन एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरेश कुमार बिरबलराम गुर्जर (वय ३४, रा. धानी नापावली, पोस्ट डुंगा की नागल, ता. का. ठाणा, जि. सीकर, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध कलमांन्वये सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. अर्थातच हे अवैध व्यवसाय अचानक सुरू झालेले नाहीत.परंतु संपूर्ण राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading