Headlines

नंदुरबारात स्टेट बँकेच्या शाखेत अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले !

Screenshot

नंदुरबार,दि.०३(द नरिमन पॉईंट )नंदुरबारात भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांची वर्दळ असतांना अचानक गोळीबाराच्या आवाजाने सारेच बिथरले .दरम्यान यामुळे एकच खळबळ उडाली.काही काळ भीतीपोटी जीव मुठीत घेऊन ग्राहकांनी पळापळ सुरु केली . बँकेत गोळीबार झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि मग पोलिस प्रशासनाची देखील एकच खळबळ धावपळ उडाली !

याबाबत माहिती अशी कि , नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत बँकेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक चुकून फायर झाले.अर्थातच बँकेत झालेल्या गोळीबारामुळे ग्राहकांमध्ये काही काळ एकच गोंधळ उडाला .दरम्यान या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
नेहमीप्रमाणे बँकेचे कामकाज व आर्थिक व्यवहार सुरू होते. अशातच बँकेच्या सुरक्षारक्षकाकडून त्याच्या हातातील बंदूक हाताळत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला. त्यामुळे थेट बंदुकीतून गोळी फायर झाली. बँकेत गोळीचा आवाज ऐकताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि ग्राहक जीव वाचवण्यासाठी पळू लागले .काही काळ कुणालाही काहीच न समजल्याने प्रचंड गोंधळ उडाला असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले .
या गोळीबाराच्या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला आहे. त्यास तातडीने बँकेचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेत सुदैवाने कुठलीही मोठी जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडलेली नाही. असे पोलीस व बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले . बँकेत गोळीबार झाल्याची माहिती शहरात पसरल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी स्टेट बँकेत पोहचले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले .सदर टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे आणि गोळीचे विखुरलेले अवशेष जप्त केले असून, पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस सुरक्षारक्षकाची चौकशी करत असून कारवाई सुरू असल्याचे समजते .

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading