Headlines

२०१७ आणि २०१९ मधील वंचित शेतकऱ्यांना आता मिळणार कर्जमाफी !

५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा लाभ शक्य

मुंबई दि,०९ (द नरिमन पॉईंट ) यापूर्वी सन २०१७ आणि २०१९ मध्ये राज्यात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी तांत्रिक किंवा अन्य  कारणांमुळे वंचित राहिले होते, अर्थात ज्या शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

मंत्रिमंडळाच्या आजच्या  बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, सन २०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वंचित राहिले होते, अशा शेतकऱ्यांचा  नव्या कर्जमाही  निर्णयात समावेश करण्यात आला आहे. या मागील काळात वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने नव्याने अधिकच्या निधीस मंजुरी दिली दिल्याचे समजते . या नव्या निर्णयामुळे राज्यातील ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सांगण्यात येत आहे . नुकत्याच मंजूर झालेल्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या विविध अटीशर्तीमुळे या कर्जमाफीचा लाभ नक्की कसा मिळेल याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत होते . मिळालेल्या माहीतीनुसार  फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१७ साली आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीवेळी ज्या शेतकऱ्यांची  कर्जमाफी झाली नव्हती अशा वंचित शेतकऱ्यांना यंदा नव्या योजनेचा  लाभ दिला जाईल याबाबत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दुजोरा दिला आहे .या योजनेची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, याकरिता  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आहे .

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading