धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम उपविभागात कोट्यावधी रुपयांच्या बांधकामात शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सुमारे एप्रिल २०२४ नंतर बांधकाम साहित्य चाचणी न करताच शासकीय निधीच्या अनेक कामात निकृष्ट साहित्याचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे एकूणच कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासन साखर झोपेत आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक उपविभागात निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या तक्रारी येत आहेत.त्याची पडताळणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बांधकाम उपविभाग शिंदखेडा यांना दि.०१/०४/२०२४ ते आजपर्यंत या कालावधीत उपविभागात झालेल्या किती बांधकामात कामे सुरु करण्यापूर्वी बांधकाम साहित्याची शासकीय प्रयोगशाळेतील चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल माहिती अधिकारात मागविण्यात आली .सदर माहितीचे उत्तरात संबंधित विभागाने केवळ १२ पाने इतकी माहिती पुरविली आहे .सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षात या विभागात कोट्यावधी रुपयांची कामे झालेली आहेत व सुरु आहेत. वास्तविक पालकमंत्र्यांनी स्वतःचा मतदारसंघ म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी याउपविभागात उपलब्ध करून दिलेला आहे . असे असताना सदर उपअभियंता श्री .ए .बी .पवार यांनी २४ महिन्यात शेकडो कामाच्या साहित्य चाचणीचे अहवाल १२ पाने पुरविणे हि बाब अत्यंत गंभीर आहे . मिळालेल्या माहितीत देखील ०१/०४/२०२४ नंतरच्या एकाच कामाचे केवळ २ पाने आहेत .म्हणजे ते काम देखील सन २०२३-२४ या वर्षातील आहे .जर दोन वर्षाच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या कामात शासनाच्या नियमांचे थेट उल्लंघन होत असताना ठेकेदारांना कामाची बिले कशी दिली गेली .मोजमाप पुस्तकात बनावट नोंदी केल्यात कि काय ?अशी शंका आता उपस्थित होत आहे .उदाहरणच द्यायचे झाले तर दोंडाईचा ते सोनगीर या राज्य महामार्गाच्या तीनशे कोटींच्या कामात ठेकेदाराकडून सर्रास निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने गैरव्यवहार होत असल्याचे अनेक माध्यमांनी समोर आणले होते .चिमठाणे गावाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या या कामात ठेकेदाराने मुरुमाऐवजी चक्क पिवळी माती वापरत असल्याच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री .अजय पवार यांच्याकडे केल्या होत्या व उपअभियंता पवार यांनी तक्रारदार कसे चुकीचे आहेत हे सांगताना कामात माती नव्हे विहिरीचा मुरूम टाकल्याची कबुली दिली होती . हा भ्रष्टचार नव्हेतर काय आहे . सदर बाब उजेडात आल्यामुळेच उपविभागात झालेल्या किती बांधकामात कामे सुरु करण्यापूर्वी बांधकाम साहित्याची शासकीय प्रयोगशाळेतील चाचणी करण्यात आली त्याचे अहवाल माहिती अहवालात मागविण्यात आली असता मिळालेली माहिती गंभीर व एकूणच कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे .
पुढील भागात -माहिती अधिकारातही कागदपत्रांची फेरफार

