धुळे व जळगाव आगारातील बस बारडोलीजवळ एकमेकांना धडकल्या ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
नवापूर -सुरतहून धुळ्यास जाणाऱ्या एसटी बसला ट्रॅक्टरची धडक बसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यात बस डिव्हायडरवर धडकली ;त्याच वेळी पलीकडील मार्गावरून धावणाऱ्या जळगाव-सुरत बसला धुळे-सुरत बसची धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की धुळे-सुरत बस दोनवेळा उलटली आणि क्षणातच बसने पेट घेतला या आगीत ७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे…
