गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट !
मुंबई दि.०१(द नरिमन पॉईंट)रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का पचवत नाही तोपर्यंत अंतिम सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना गुजरात टायटन्सच्या संघाला दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागले ;सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना संघाच्या बसला अचानक आग लागली सुदैवाने, वेळेत खबरदारी घेतल्यामुळे शुबमन गिलसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षित बचावले !
गुजरात टायटन्सच्या संघ सामना संपल्यानंतर हॉटेलकडे परतत असताना बसमधील इलेक्ट्रिकल बिघाडामुळे अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि गाडीच्या आत मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. धूर दिसताच बस चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सुदैवाने, व्यवस्थापनाच्या प्रसंगावधानाने सर्व खेळाडूना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान दुसरी व्यवस्था होईपर्यंत खेळाडूंना काही काळ रस्त्याच्या कडेलाच बसून राहावे लागले. त्यानंतर तातडीने दुसऱ्या बसची सोय करून खेळाडूंना हॉटेलकडे रवाना करण्यात आले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून रविवारी रात्री हॉटेलकडे जात असताना हा अपघात घडला. बसच्या वायरिंगमध्ये ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले . बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने बस थांबवली. सर्व खेळाडू आणि स्टाफला तातडीने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे गुजरातचे खेळाडू जवळपास पाऊण ते एक तास रस्त्यावरच अडकून पडले होते. त्यानंतर दुसऱ्या बसची व्यवस्था करून त्यांना हॉटेलकडे रवाना करण्यात आले.

