Headlines

विधानपरिषदेत प्राजक्त तनपुरे भाजपाचे संभाव्य उमेदवार ?

मुंबई दि.२७ (द नरिमन पॅाईंट) तशी बातमी आश्चर्य वाटण्याची मुळीच नाही ;परंतू विधानसभा पोटनिवडणूकीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स बाळगणारे शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यासू,संयमी व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे संभाव्य उमेदवार असतील अशी माहिती समोर येत आहे.

राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली , अगदी तेव्हापासूनच ते भाजपच्या मनात आणि संपर्कात होते.तनपुरे कुटुंबाचा अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४-५ दशकांपासून मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत.प्रसाद तनपुरे राजकारणात अनेक वर्षे सक्रीय होते. एकदा खासदार आणि पाचवेळा आमदार अशी त्यांची मोठी उल्लेखनीय कारकीर्द आहे .अर्थातच प्राजक्त तनपुरे यांची भाजपमधील भावी वाटचाल शरद पवार राष्ट्रवादी गटासाठी एक मोठा धक्का आहे.

राहूरीचे नगराध्यक्ष असतानाच २०१९ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवून, राज्याच्या विधानसभेत प्रवेश आणि थेट सहा खात्यांचे राज्यमंत्री अशी दमदार कारकीर्द प्राजक्त तनपूरे यांच्या नावावर आहे.त्यामुळे येत्या काळात २०२९ ची विधानसभा स्वबळावर लढविण्याचे लक्ष असणारे भाजपचे नेतृत्वाला जिल्ह्यात राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी या प्रवेशाच्या निमित्ताने ही मोठी संधी आहे.

अर्थात मागील काळात अन्य बड्या राजकारणींच्या बाबतीत जे घडले त्यातून प्राजक्त तनपुरेंची देखील सुटका झालेली नव्हती.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली त्यांचीही चौकशी झाली . यावेळी तनपुरेंची सुमारे साडेतेरा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती माध्यमातून त्यावेळी समोर आली होती.

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading